संत एकनाथ-सचिन घायाळ शुगरला ऊस घालताना शेतकऱ्यांनी सावध राहावे : तुषार पाटील शिसोदे

Foto
गोपनीयता पाळून संत एकनाथ, सचिन घायाळ शुगर प्रा. लि.च्या गळीत 
हंगामाची सुरुवात, संत एकनाथला गाळपाची परवानगी नाही

पैठण (प्रतिनिधी) पैठण तालुक्याची संजीवनी असलेला गोरगरीब शेतकरी सभासदांचा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची दयनीय अवस्था सचिन घायाळ शुगर कंपनीने केली आहे. मोजक्याच लोकांना सोबत घेऊन संत एकनाथ सचिन घायाळ प्रा.लि. सन २०२५ २६ च्या गळीत हंगामाची सुरुवात ९ नोव्हेंबर रविवारी रोजी करण्यात आली असल्याचा आरोप माजी चेअरमन तुषार पाटील शिसोदे यांनी पत्रकार परिषदेमार्फत केले आहे.

सचिन घायाळ यांनी चोरट्या मार्गाने गळीत हंगाम सुरु केला, हा कारखान्याशी निगडित असलेल्या शेतकरी सभासदांचा अवमान आहे. गळीत हंगाम सुरु करतांना परिसरात तील शेतकऱ्यांना माहिती देण्याची गरज होती परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता गळीत हंगामात सुरुवात करण्यात आली आहे. संत एकनाथ हा शेतकरी सभासदांचा कारखाना आहे, परंतु शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सचिन घायाळ शुगर या कारखान्याकडून चालू त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी पत्रकार परिषदे मार्फत माहिती देत असल्याचे तुषार पाटील शिसोदे यांनी म्हटले, या सचिन घायाळ शुगर कंपनीने संत एकनाथ कारखान्याची मालमत्ता गहाण ठेऊन ३० कोटी रुपयांचे कर्ज काढले, 

ते ३० कोटी रुपये सचिन घायाळ शुगर कंपनीच्या खात्यावर जमा करून त्यातून १३ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य बँकेचे भरले, व उर्वरित १७ कोटी कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी न वापरता किंग्स इथेनॉल नावाची कंपनी काढून, त्या कंपनीला जमीन घेण्यासाठी साडे सहा कोटी रुपयांचा गैर व्यवहार केला, ही कंपनी अभिरुची सचिन घायाळ यांच्या नावे आहे. व उर्वरित पैसे कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी वापरले नाही, ५८ कोटीची हमी घेऊन संत एकनाथ सहकारी साखर कारखाना १८ वर्षासाठी चालवायला घेतला, 

यातील शर्ती व अटीचा पूर्ण पणे भंग झालेला आहे. याबाबतीत साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे दावा दाखल करण्यात आलेला असून १४ नोव्हेंबर २०२५ रोजी याबाबत अंतिम सुनावणी ची शक्यता आहे. संत एकनाथ कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांची १९ कोटी देण्याचे सचिन घायाळ शुगर कंपनी ने हमी घेतली असतानी, एकही रुपया कामगारांना अद्याप दिला नाही. कामगारांच्या केसेस कामगार न्यायालयात प्रलंबित आहेत.

कुठल्याही प्रकारची हमीतील देणे न फेडता ही कंपनी कर्जा च्या खाईत डुबलेली असताना आता साखर व्यापाऱ्यांकडून ऍड अॅडव्हान्स पैसे उकळण्याचे काम ही कंपनी करित आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, शेतकऱ्यांनी संत एकनाथ सचिन घायाळ शुगर ला ऊस देतांना सावधानता बाळगावी, कारण तुम्ही कष्ट करून पिकवलेला ऊस तुम्ही देत आहात पण उसाचे पेमेंट तुम्हाला मिळेल की नाही याची खात्री देता येणार नाही, कारण मागच्या शेतकऱ्यांचे उसाचे बिल अद्याप मिळाले नाही. असा आरोप तुषार पाटील शिसोदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.